अभिनेते योगेश सोमण यांचे १२ मार्चला ‘सावरकर : काल, आज आणि उद्या’यावर व्याख्यान !
कोल्हापूर, ११ मार्च (वार्ता.) – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळा’च्या वतीने शनिवार, १२ मार्च या दिवशी अभिनेते योगेश सोमण यांचे १२ मार्चला ‘सावरकर : काल, आज आणि उद्या’ याविषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या राम गणेश गडकरी सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, उपाध्यक्ष श्री. श्रीरंग कुलकर्णी आणि कार्यवाह शालन शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. नितीन वाडीकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लेखक, साहित्यिक, नाटककार, निस्सिम देशभक्त, तसेच अन्य पैलू समाजापुढे आणून गेली ८ वर्षे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळ’ समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. मंडळाच्या वतीने शाळा आणि महाविद्यालयात जागृती करण्यासमवेत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध आणि जलतरण स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. २६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनाचे औचित्य साधून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.’’