५ राज्यांमधील दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटाच्या नेत्यांनी बोलवली बैठक !
‘जी-२३’ म्हणजे काँग्रेसमधील वरिष्ठ असलेल्या २३ नेत्यांचा गट
घराणेशाही, हिंदुद्वेष, राष्ट्राघातकी निर्णय, मुसलमानांचे अतीलांगूलचालन यांमुळे काँग्रेस आता संपण्याच्या मार्गावर आहे. हे काँग्रेसच्या नेत्यांना आता लक्षात येत असले, तरी हे एक वास्तव आहे. ते आता कुणीही पालटू शकत नाही, हे त्यांनी स्वीकारयला हवे ! – संपादक
नवी देहली – ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. पंजाबमध्ये असलेली सत्ता काँग्रेसला गमवावी लागली आहे. या स्थितीनंतर काँग्रेसमधील ‘जी-२३’ या गटाच्या नेत्यांनी बैठक बोलावली आहे. दुसरीकडे ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, ‘पक्षाची पुढील वाटचाल कशी असावी, यासंदर्भातील चर्चेसाठी पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक लवकरच बोलवण्यात येणार आहे’, असा संकेत दिला आहे. अनेक नेत्यांना यासंदर्भात काहीच कल्पना नसल्याची माहिती समोर येत आहे.
Disappointed with the Assembly election results in Manipur, Punjab, Uttarakhand, Uttar Pradesh and Goa, the Congress’ group of 23 leaders (G-23) will convene a meeting in the next 48 hours, a senior leader said.https://t.co/rBN9OiAhN0
— The New Indian Express (@NewIndianXpress) March 10, 2022
काँग्रेसने देशासमोर मांडलेल्या सकारात्मक धोरणाला सशक्त करण्याची हीच वेळ ! – शशी थरूर
काँग्रेसवर विश्वास असणार्या सर्वांना विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून दु:ख झाले आहे. काँग्रेसने मांडलेल्या भारताच्या संकल्पनेला आणि देशासमोर मांडलेले सकारात्मक धोरण यांना सशक्त करण्याची हीच वेळ आहे.
पदाची लालसा असणारे पक्षातील लोकच पक्षाची हानी करत आहेत ! – काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीत सुरजेवाला यांनी निवडणुकीच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले, ‘आपण (काँग्रेसवाले) ज्या फांदीवर बसलो आहेत, तिलाच कापले, तर झाड, फांदी आणि नेतेही पडणार. आज अनेक राज्यांमध्ये हेच चित्र पहायला मिळत आहे. पदाची इच्छा एवढी तीव्र झाली आहे की, आपण त्याच झाडाला हानी पोचवत आहोत ज्यावर काँग्रेसचे लोक बसले आहे. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर सर्वांनी विचार केला पाहिजे.’