कर्नाटकच्या शासकीय धान्य योजनेतील तांदुळाची आफ्रिकेमधील देशांमध्ये विक्री !
या प्रकरणी पनवेल, खोपोली, तसेच पुणे येथे गुन्हे नोंद
गुन्हे नोंद करून न थांबता लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तांदुळाची अशाप्रकारे अवैध विक्री होते, तर यावर कुणाचा अंकुश कसा नाही ? – संपादक
पुणे – कर्नाटकच्या शासकीय धान्य योजनेतील तांदुळाची आफ्रिकेतील देशांमध्ये विक्री होत आहे. कर्नाटकातील तांदूळ ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’च्या (जे.एन्.पी.टी.) बंदरातून जहाजाने आफ्रिकेतील देशात पाठवण्यात येत होता. आफ्रिकेतील देशांत तांदुळाची विक्री अधिक दराने करण्यात येत असून या प्रकरणी पनवेल, खोपोली, तसेच पुणे येथे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चालू करण्यात आले आहे.
आफ्रिकेत पाठवण्यात येणार्या अवैध तांदूळ विक्रीत व्यापारी, कर्नाटकातील शासकीय धान्य विक्री करणारे दुकानदार, दलाल, मालवाहतूकदार अशी मोठी साखळी गुंतलेली आहे. पनवेल आणि खोपोली येथील गुन्ह्यांत आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात मोठ्या व्यापार्यांचा समावेश आहे. या प्रकरणातील काही आरोपींनी न्यायालयाकडून जामीनही मिळवला आहे.