(म्हणे) ‘आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे ! ’ – प्रियांका वाड्रा यांचा कार्यकर्त्यांना संदेश !
काँग्रेसला जनता नाकारत असल्यामुळे काही वर्षांत हा पक्ष इतिहासजमा होईल. हे लक्षात घेता अशा सल्ल्याचा काही उपयोग होणार नाही, हे वाड्रा यांनी लक्षात घ्यावे !
उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळणार नाही, हे मतदानोत्तर चाचणीतून उघड झाले होते. याच अनुषंगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी मतमोजणीच्या आदल्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्वीटद्वारे संदेश दिला. त्यात त्यांनी लिहिले, ‘राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार नसतांनाही तुम्ही ज्या प्रकारे जनतेसाठी लढलात आणि राजकारणाचा खरा उद्देश असलेल्या जनसेवेसाठी कटीबद्ध राहिलात, याचा मला फार अभिमान आहे. आपला लढा नुकताच चालू झाला आहे. आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे.’