भाजपच्या विजयाने २०२४ चा संसदेचा विजय निश्‍चित केला आहे ! – पंतप्रधान मोदी

भाजपचा विजयाचा चौकार !

नवी देहली – भाजपच्या विजयाने २०२४ चा संसदेतील भाजपचा विजय निश्‍चित केला आहे. योगी अदित्यनाथ हे भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, जे उत्तरप्रदेशात सलग दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत. गोव्यात सर्व राजकीय विश्‍लेषणे आणि अंदाज यांच्या विरोधात जाऊन भाजपने विजय मिळवला. उत्तराखंड राज्यात प्रथमच एका राजकीय पक्षाने सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. मणीपूर या पूर्वोत्तर राज्यातही भाजपला सलग दुसर्‍यांदा सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. या माध्यमातून भाजपने विजयाचा चौकार लगावला आहे. पंजाबमध्येही भाजपला फुटीरतावादी राजकारणाला दूर ठेवायचे आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते १० मार्चच्या सायंकाळी भाजपच्या देहलीतील मुख्य कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.