चित्रपटावरील बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे आभार ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
भारतात राष्ट्रभक्तांनी कोणतीही कारवाई केल्यास राष्ट्रविरोधक एकत्र येतात. कुठे ‘मॉब लिंचिंग’ (समूहाने केलेली हत्या) झाल्यास साम्यवादी आणि तथाकथित बुद्धीजीवी एकवटतात; पण हिंदूंवर आक्रमण किंवा हिंदूंची हत्या झाल्यास हे लोक शांत बसतात. हिंदु पंडितांचा मोठा नरसंहार होऊनही साम्यवाद्यांनी अश्रू ढाळले नाहीत किंवा सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले नाहीत.
मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटावरील बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली, यासाठी न्यायालयाचे आभार ! हा योग्य निर्णय आहे. काश्मीरमध्ये हिंदु समाजासमवेत काय घडले, ते संपूर्ण विश्वाला समजले पाहिजे. तेथे नरसंहार झाला, तेव्हा (केंद्रात) काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. आताच्या भाजप सरकारने काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करायला हवे.