परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत घेण्यात आलेल्या विविध प्रयोगांच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना जाणवलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले

जानेवारी २०१८ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी साधकत्ववृद्धी शिबिर घेण्यात आले होते. त्या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत त्या साधकांसाठी काही प्रयोग घेण्यात आले. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. श्री. ऑरित्रो मल्लिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. प्रसाधनगृहातील राखाडी रंगाची लादी

‘या लादीवर उभे राहिल्यावर मला ‘पाण्याप्रमाणे दिसणारी शक्ती खालून माझ्या पायांमध्ये वरच्या दिशेने जात आहे’, असे जाणवले. त्या वेळी मला सकारात्मक वाटत होते.

१ आ. आश्रमाच्या बाहेर असलेला रस्त्यावरील पिवळा दिवा

श्री. ऑरित्रो मल्लिक

या दिव्याकडे पहातांना मला ‘प्रकाशकिरण आणि विविध रंगांतील अनेक छोटे कण विशिष्ट आकृतीबंधात वेगाने फिरत आहेत’, असे दिसले. त्यात इंद्रधनुष्याचे सर्व रंग होते.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतीवर पडणारी सावली

भिंतीवर एका साधकाच्या हाताची सावली पाहतांना मला हाताच्या बोटांवर जेथे रेषा असतात, तेथे प्रकाशाचे पट्टे दिसले. ‘त्या सावलीला खोली आहे, तसेच सावलीला नारिंगी रंगाची तेजस्वी कडा आहे’, असे मला जाणवले.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंती, दरवाजा, लाद्या, छत आणि कुलदेवतेची प्रतिमा यांवर आलेले फुगवटे

या फुगवट्यांकडे पहातांना मला नकारात्मकता आणि जडपणा जाणवला.

१ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील अनिष्ट शक्तींचे आक्रमण झालेल्या लाद्या

अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लाद्यांवर विविध आकृत्या उमटलेल्या आहेत. त्यात पूर्वी एका लादीवर एक पाऊल उमटले होते. त्याकडे पाहिल्यावर मला नकारात्मक वाटत होते. आता जेव्हा मी त्या पावलाची आकृती उमटलेल्या लादीकडे पाहिले, तेव्हा मला ती आकृती विरून गेल्याप्रमाणे स्वच्छ दिसली. ‘त्या लादीतील सर्व नकारात्मकता नष्ट झाली आहे’, असे मला जाणवले. एका लादीवर उमटलेल्या तोंडवळ्याच्या आकृतीकडे पहातांना मला ‘तो तोंडवळा आश्चर्यचकित आणि वेदनाग्रस्त आहे’, असे जाणवले.’

(६.१.२०१८)

२. सौ. वैशाली धवस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. वैशाली धवस

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंती, दरवाजा, लाद्या, छत आणि कुलदेवतेची प्रतिमा यांवर आलेले फुगवटे

‘जेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर आलेल्या फुगवट्यांना स्पर्श केला, तेव्हा मला ‘त्यांना स्पर्श करतच रहावे’, असे काही वेळा वाटले, तर काही वेळा ‘ते चांगले नसल्याने त्यांना स्पर्श करू नये’, असे वाटले. त्या वेळी मला ‘ते चांगले वाटतात कि त्रासदायक ?’, हे निश्चितपणे कळत नव्हते. नंतर माझ्या लक्षात आले, ‘तो स्पर्श मायावी असल्यामुळे मला काही वेळा स्पर्श करण्याची इच्छा होत होती आणि नंतर ‘हात त्यांच्यापासून दूर न्यावा’, असे वाटत होते.’

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतीवर पडणारी सावली

मी भिंतीवरील हाताची सावली पहात असतांना मला ती सावली वाटली नाही; कारण तिचा रंग काळसर नसून नारिंगी होता, तसेच ती सावली पारदर्शक होती. ‘त्या सावलीत नेमके काय दिसते ?’, हे पहाण्यासाठी मी तिच्यापासून थोडी दूर गेले. त्या वेळी मला हाताच्या सावलीतील रेषा आणि रंग स्पष्टपणे दिसला. एरव्ही मला सावल्यांची थोडी भीती वाटते; परंतु या सावलीकडे पहातांना मला चांगले वाटत होते.’

(८.२.२०१८)