उत्तरप्रदेशमध्ये शिवसेनेला अपयश : एकही जागा जिंकता आली नाही !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये प्रथमच मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले होते. शिवसेनेकडून एकूण ६० जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांतील १९ जणांचे अर्ज बाद झाले होते. उर्वरित ४१ जणांपैकी एकालाही विजय मिळवता आला नाही. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्रातील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, तसेच अन्य नेते उत्तरप्रदेशात पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातही प्रसारसभा घेतली होती.
उत्तर प्रदेशात शिवसेनेचं डिपॉझिटही जप्त होणार?#Shivsena #ElectionResults #Election2022 #AssemblyElections2022 #UPElection2022 #ElectionwithMata https://t.co/fGvKB7Ai27 via @mataonline
— Maharashtra Times (@mataonline) March 10, 2022