‘पेनड्राईव्ह’मधून सादर केलेल्या पुराव्यांची चौकशी झाली नाही, तर न्यायालयात जाऊ ! – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – सरकारमधील काही नेत्यांनी केलेल्या षड्यंत्राविषयीचे पुरावे देवेंद्र फडणवीस यांनी ‘पेनड्राईव्ह’मधून सरकारला सादर केले आहेत. सरकारने ‘सीबीआय्’द्वारे त्यांची चौकशी करावी. चौकशीला बगल दिली, तर आम्ही न्यायालयात जाऊ, अशी चेतावणी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. १० मार्च या दिवशी विधान परिषदेत कायदा आणि सुव्यस्था यांच्या चर्चेच्या वेळी त्यांनी ही मागणी केली. ८ मार्च या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:वरील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात होत असलेल्या षड्यंत्राच्या पुराव्यांचा ‘पेनड्राईव्ह’ विधानसभेत सादर केला आहे.