विधानभवनातील बैठकीत एस्.टी.च्या संपाविषयी सकारात्मक चर्चा !
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – एस्.टी. महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस्.टी. कर्मचार्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन चालू आहे. एस्.टी. महामंडळाच्या संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात ९ मार्च या दिवशी बैठक पार पडली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून ४ मासांपासून चालू असलेला ‘एस्.टी.’चा संप मिटण्याची शक्यता आहे.
१० मार्च या दिवशी सकाळी १० वाजता विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या बैठकीतून निघालेल्या तोडग्याविषयी सभागृहात माहिती देणार आहेत, तसेच त्यांच्या निर्देशानुसार एस्.टी. संपाविषयी आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे.