सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास न्यून होणे
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
‘२३.११.२०२१ या दिवशी माझ्या गुडघ्याचे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी रुग्णालयात आणि घरी आल्यावर मला बद्धकोष्ठतेचा पुष्कळ त्रास झाला. तो त्रास सहन करण्याची माझी क्षमता न्यून झाली होती. माझी मुलगी सौ. मनीषा अरविंद पानसरे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना वेळोवेळी नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘हा शारीरिक त्रास आहे. तो नामजप केल्याने न्यून होईल.’’ सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप केल्याने मला होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास न्यून झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. लक्ष्मी कोंडिबा जाधव (वय ७२ वर्षे), फोंडा, गोवा. (२१.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |