मुंबई पोलीस दलातील महिलांना केवळ ८ घंटे काम देण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
मुंबई – महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलीस दलातील महिलांना यापुढे केवळ ८ घंटे काम देण्याचे आदेश दिले आहे.
कोरोना काळात मुंबई पोलीस दलातील महिला कर्मचार्यांनाही २४ घंटे काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना खासगी आयुष्य आणि नोकरी यातील समतोल राखणे कठीण झाले होते. त्यामुळे पांडे यांनी वरील निर्णय घेतला आहे. यामुळे महिला पोलीस कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.
Maharashtra: Women cops to now have 8-hour duty instead of 12 for ‘work-life balance’ https://t.co/XP9wDine98
— Republic (@republic) January 29, 2022
महिला कर्मचार्यांसाठी ८ घंट्यांच्या कामामध्ये दोन पर्याय असणार आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये ३ सत्र (पाळी) आहेत. यामध्ये पहिल्या पर्यायात सकाळी ८ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशी कामाची वेळ असणार आहे.