मुंबई पालिकेत शेवटच्या दिवशी विनाचर्चा ६ सहस्र कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत

भाजपकडून गदारोळ !

मुंबई – मुंबई महापालिकेची ७ मार्च या दिवशी मुदत संपतांना शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत विनाचर्चा ६ सहस्र कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत करण्यात आल्याने  भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधातही या वेळी घोषणा दिल्या.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्चला संपणार आहे. त्यानंतर पालिकेचा कारभार ८ मार्चपासून प्रशासकाच्या माध्यमातून चालू रहाणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.