महिलादिनाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने घरेलू कामगार महिलांचा सत्कार !
सांगली, ८ मार्च (वार्ता.) – जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजवाडा परिसरात रहाणार्या धुणी-भांडी, भोजन साहाय्यक म्हणून काम करणार्या ६० हून अधिक घरेलू कामगार महिलांचा भाजपच्या नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांनी सत्कार केला. या वेळी घरेलू कामगार महिलांना अल्पाहार आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या वेळी सुमनताई टिळक, मेधिनी जोशी उपस्थित होत्या.