विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसची व्यवस्था काही दिवसांत करू ! – अनिल परब, परिवहन मंत्री
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – एस्.टी. बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा सरकारचा विचार नाही; मात्र विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था करणार आहोत. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिले. याविषयीच्या तारांकित प्रश्नावर अनिल परब यांनी वरील उत्तर दिले.