भारताने कुतुब मिनारवर रशियाच्या राष्ट्रध्वजाप्रमाणे रोषणाई केल्याचा चीनच्या सरकारी वृत्तपत्राचा दावा

भारताने दावा फेटाळला !

डावपेचात हुशार असणारा चीन ! – संपादक

नवी देहली – चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने भारतातील कुतुब मिनारवर रशियाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांनुसार रोषणाई केल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. भारताने हे वृत्ते खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. याद्वारे चीनने ‘युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात भारत अप्रत्यक्ष रशियाला साहाय्य करत आहे’, असे जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत सरकारकडून ५ ते ७ मार्च २०२२ या कालावधीत ‘जनऔषधि दिवस २०२२’ साजरा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने कुतुब मिनारवर रोषणाई करण्यात आली होती; मात्र ती रशियाच्या राष्ट्रध्वजानुसार नव्हती.