युक्रेनमधून भारतियांना बाहेर काढतांना दक्षिण भारतियांपेक्षा उत्तर भारतियांना प्राधान्य देत असल्याचा द्रमुक सरकारचा खोटा आरोप !

  • ‘आमची तमिळी संस्कृती’, ‘आमची वेगळी तमिळी परंपरा’, असे दाखवण्यासाठी तमिळी जनतेच्या मनात उत्तर भारतियांच्या विरोधात द्वेष पेरणारा द्रमुक पक्ष हा राष्ट्रघातकी होय ! अशा पक्षावर बंदीच हवी !
  • उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय हा वाद पेटवत ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी द्रमुक किती खालच्या थराला जाऊन राजकारण करतो, याचे हे उत्तम उदाहरण !

चेन्नई – रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू असतांना भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढून सुखरूपपणे भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र या घटनेला तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम्ने (द्रमुकने) पुन्हा एकदा प्रादेशिक रंग देऊन अश्‍लाघ्य राजकारण केले आहे. ‘युक्रेनमधून भारतियांना बाहेर काढत असतांना भारत सरकार दक्षिण भारतियांपेक्षा उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना प्राधान्य देत आहे’, असा खोटा आरोप द्रमुकचे प्रवक्ते ए. सर्वानन् यांनी केला आहे. याविषयी पुरावा देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. (पुरावे नसतांना खोटे आरोप करणारे खोटारडे द्रमुकवाले ! – संपादक)

तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तमिळनाडूमधील ४ आमदारांना हंगेरी, रोमानिया, पोलंड आणि स्लोवाकिया येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तमिळनाडूतील मुलांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’वर अवलंबून न रहाता स्वतंत्र मोहीम राबवणार आहे, असे द्रमुककडून सांगण्यात आले. ‘युक्रेनमधील भारतीय दूतावासातील अधिकारी केवळ हिंदी भाषेचा वापर करत आहेत, असा आरोपही द्रमुकने केला आहे. (युक्रेनमधील भारतीय दूतावासाने आतापर्यंत जेवढ्या सूचना सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्या आहेत, त्या इंग्रजीमध्ये आहेत. असे असतांना खोटे बोलणारे द्रमुकवाले ! – संपादक)