देहली येथे मूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेल्या वादातून एकाची हत्या

नवी देहली – येथील यमुना घाटावर श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतत असतांना झालेल्या वादातून रमझानी नावाच्या अल्पवयीन मुलाची अन्य एका अल्पवयीन मुलाने चाकूने भोसकून हत्या केली. आरोपी शकरपूर येथील रहाणारा असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेच्या वेळी येथे गर्दी होती.