राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्ण यांना अटक

पदाचा दरुपयोग करून आस्थापने आणि दलाल यांना ५० सहस्र कोटी रुपयांचा लाभ करून दिला !

राष्ट्रीय शेअर बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असतांना संबंधित यंत्रणा झोपल्या होत्या का ? – संपादक

‘एन्.एस्.ई.’च्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण

नवी देहली – राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (‘एन्.एस्.ई.’च्या) माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अटक केली. अटक करण्याआधी त्यांची सलग ३ दिवस चौकशी करण्यात आली.

याआधी चित्रा रामकृष्ण यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला होता; मात्र तो फेटाळण्यात आला. रामकृष्ण यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून शेअर्सविषयी गोपनीय माहिती काही आस्थापने आणि दलाल यांना आधीच देत होत्या. त्यामुळे ही आस्थापने किंवा दलाल यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ होत होता. ५ वर्षांमध्ये संबंधितांना ५० सहस्र कोटी रुपयांचा लाभ झाल्याचे बोलले जात आहे.