आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू ! – पुतिन

मॉस्को (रशिया) – आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण चालू केले होते.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची हत्या झाल्यास युक्रेनची पुढील योजना सिद्ध – अमेरिकेचा दावा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की युद्धात मारले गेल्यास युक्रेनने पुढील योजना सिद्ध केली आहे, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकने यांनी केला. झेलेंस्की वारंवार रशियाने त्यांना ठार मारण्याचा आदेश दिल्याचा दावा करत आहेत. झेलेंस्की यांना ठार करण्यासाठी रशियामधील अनेक जण कीव शहरात आले आहेत. ब्लिंकने यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना युक्रेन सरकारचे नेतृत्व उल्लेखनीय असल्याचे सांगितले.