आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाच्या विरोधातील युक्रेनच्या याचिकेवर सुनावणी

रशिया न्यायालयीन सुनावणीमध्ये सहभागी होणार नाही

आंतरराष्ट्रीय न्यायालय

हेग (नेदरलँड) – रशियाने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर ७ मार्च २०२२ या दिवशी सुनावणी करण्यात आली. युक्रेनने रशियावर नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. न्यायालय या प्रकरणी चौकशी करून यावर निर्णय देणार आहे. या सुनावणीच्या वेळी रशियाकडून कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. रशियाने या सुनावणीमध्ये सहभागी न होण्याचे घोषित केले आहे.

न्यायालयामध्ये युक्रेनचे प्रतिनिधी अँटनी कोरिनेविच यांनी सांगितले, ‘युक्रेनने यापूर्वीही रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून युक्रेनचा अवमान केला आहे. आता जगाला रशियाचा द्वेष आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा खोटारडेपणाही ठाऊक झाला आहे. न्यायालयाने रशियाला हे युद्ध समाप्त करण्याचा आदेश दिला पाहिजे.’