रुग्णसंख्येनुसार मनुष्यबळ पुरवण्यावर भर ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री
विधान परिषद कामकाज तारांकित प्रश्न
अकोला, ६ मार्च (वार्ता.) – कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन अकोला येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मनुष्यबळाची जशी आवश्यकता लागेल, त्याप्रमाणे मनुष्यबळ पुरवण्यावर भर दिला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
४ मार्च या दिवशी विधान परिषदेमध्ये आमदार अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे विक्रम काळे, सतिश चव्हाण, संजय दौंड आणि अरुण लाड यांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री अमित देशमुख यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे.