देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील अनेक गुणरत्नांचा खजिना असलेल्या सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) सनातनच्या ११८ व्या समष्टी संत घोषित !
पनवेल – तत्त्वनिष्ठता, आज्ञापालन, स्थिरता, नम्रता, अंतर्मुखता, समर्पणभावाने सेवा करणे आदी अनेक गुणरत्नांचा खजिना असणार्या मूळच्या तिवरे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील आणि सध्या सनातनच्या देवद आश्रमात वास्तव्य करणार्या सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) ६ मार्च या दिवशी सनातनच्या ११८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या भावसोहळ्यात सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ही आनंदवार्ता घोषित केली. अनेक दिवस साधक या क्षणाची उत्कंठतेने वाट पहात असल्याने सर्वांनाच आनंद झाला आणि गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृतज्ञता व्यक्त झाली !
प्रत्येक सेवा दायित्वाने सांभाळणार्या सुश्री (कु.) रत्नमाला दळवी यांचा सन्मान पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी भेटवस्तू देऊन केला. या भावसोहळ्याला देवद आश्रमातील सद्गुरु, संत आणि साधक उपस्थित होते. या भावसोहळ्यात पू. (सुश्री) रत्नमाला दळवी यांचे नातेवाईक ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.