सनातन संस्थेच्या वतीने ‘जागर स्त्री शक्तीचा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान !
समाजात वाढत चाललेल्या दुष्टप्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी नागरिकांचे, विशेषत: महिलांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. ८ मार्च या दिवशी जागतिक महिलादिन आहे. महिलादिनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलेतील देवीतत्त्व जागृत करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘जागर स्त्री शक्तीचा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाला उपस्थित राहून सर्वत्रच्या धर्मप्रेमी महिलांनी व्याख्यानाचा लाभ करून घ्यावा.
सह्याद्रीची कणखरता तू
सृष्टीची या निर्माती तू
अबला नाही सबला तू
दुष्टप्रवृत्तींचा कर्दनकाळ तू
जागर आदिशक्तीचा तू
• दिनांक : ८ मार्च २०२२
• वार : मंगळवार
• वेळ : सायंकाळी ६ ते ७
व्याख्यानासाठी ‘यू ट्यूब’ लिंक http://youtube.com/sanatansanstha
व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी क्यू.आर्. कोड स्कॅन करा.‘QR कोड’ म्हणजे ‘Quick Response कोड’. आजकाल सर्वच ‘स्मार्ट फोन्स’मध्ये ‘QR कोड स्कॅनर’ ही प्रणाली (ॲप) उपलब्ध असते. ही प्रणाली चालू करून ‘QR कोड’वर ‘स्मार्ट फोन’चा छायाचित्रक (कॅमेरा) धरावा, म्हणजे ‘कोड’ ‘स्कॅन’ होतो आणि संकेतस्थळाची मार्गिका आपोआप उघडते. |