केरळ येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेले ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप यांना उत्स्फूर्त प्रतिसाद !
कोची (केरळ) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘महाशिवरात्रीचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित करण्यात आले होते. समितीच्या कु. प्रणिता प्रसाद यांनी वरील विषयावर जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी प्रवचनात शिवाची वैशिष्ट्ये, ‘ॐ नमः शिवाय’ नामजपाचे महत्त्व आणि शिवाच्या काही तीर्थक्षेत्रांचे महत्त्व यांविषयीची माहिती देण्यात आली. याचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
महाशिवरात्रीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप पार पडला !
महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच १ मार्चला ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. कु. मेघना यांनी जिज्ञासूंना महाशिवरात्रीचे महत्त्व सांगितले आणि त्यानंतर सामूहिक नामजप करण्यात आला. या उपक्रमाला जिज्ञासूंचा पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळाला.
विशेष : श्रीमती सरसम्मा म्हणाल्या की, सामूहिक नामजपाच्या वेळी मला भगवान शिव उपस्थित असल्याचे अनुभवता आले.