मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी भक्तांनी योग्य पोषाख घालूनच मंदिरात प्रवेश करावा ! – मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

हा निर्णय देशातील प्रत्येक मंदिरांसाठी लागू करावा, असेच भाविकांना वाटते ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

चेन्नई (तमिळनाडू) – मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी भक्तांनी योग्य पोषाख घालूनच मंदिरात प्रवेश करावा. न्यायालय स्वतःचे मत समाजावर थोपवू शकत नाही. पूजेच्या ठिकाणी प्रवेश करत असाल आणि तेथे परंपरेनुसार एखादा पोषाख आवश्यक असेल, तर तोच घालावा, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘ज्या मंदिरांमध्ये पोषाखाचे बंधन आहे, त्यांनी मंदिराबाहेर सूचना फलक लावून याची माहिती द्यावी’, असेही न्यायालयाने म्हटले. मंदिरांना पोषाख (ड्रेस कोड) अनिवार्य करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. पुरुषांसाठी धोती-कुर्ता, महिलांसाठी साडी किंवा सलवार कमीज आणि कपाळावर सनातन धर्माचे चिन्ह लावणे अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.