पाकिस्तान ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या करड्या सूचीमध्ये कायम !  

पॅरिस (फ्रान्स) – फायनॅन्शिल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफ्.ए.टी.एफ्.) या संघटनेने पाकिस्तानला पुन्हा एकदा करड्या (ग्रे) सूचीमध्ये ठेवले आहे. जून २०२२ पर्यंत पाकिस्तान या सूचीमध्ये असणार आहे. आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्यामुळे वर्ष २०१८ पासून पाकिस्तान या सूचीमध्ये आहे. पाकने जानेवारी २०२२ मध्ये ३४ पैकी ४ अटी पूर्ण केल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला त्या वेळी या सूचीत ठेवण्यात आले होते. इराण आणि उत्तर कोरिया काळ्या सूचीमध्ये आहेत.