युक्रेनमध्ये भारतियांना लाथा मारून रेल्वेमधून बाहेर काढले !
युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्याने दिली माहिती !
नवी देहली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यात येत आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांनी त्यांना युक्रेनमध्ये वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागल्याविषयीचे अनुभव सांगितले.
UP student recalls how Indian nationals were “thrown out of trains” when they went to the station for evacuation.#Ukraine #Kharkiv #RussianUkrainianWar https://t.co/ghX2VQJhvy
— IndiaToday (@IndiaToday) March 6, 2022
उत्तरप्रदेशच्या कौशांबीचा रहिवासी असलेला प्रमोद कुमार हा युक्रेनहून परतला. तो खारकीवमध्ये वास्तव्यास होता. तो म्हणाला, ’युक्रेन सरकारकडून आम्हाला साहाय्य मिळाले नाही. त्यामुळे सगळे विद्यार्थी स्वत:च बाहेर पडले. रेल्वेमध्ये चढू पहाणार्या भारतियांना लाथा मारून बाहेर काढण्यात येत होते.’ युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतियांची लवकरात लवकर सुटका करावी, असे आवाहन त्याने केंद्र सरकारला केले.