गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. खालील सर्व प्रकारच्या कलाकृतींसाठी प्रायोजक मिळवून त्याचे हिंदु नववर्ष साजरे करणारी मंडळे, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी मोठ्या प्रमाणात वितरण करावे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु संस्कृतीच्या महानतेविषयी प्रबोधन करणार्या या प्रसारमाध्यमांचा अधिकाधिक परिणामकारक वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
१. ‘ए ५’ (पाठपोट) आकारातील ‘गुढीपाडवा हाच हिंदूंचा नववर्षारंभ !’ हे प्रबोधनपर हस्तपत्रक.
२. ‘ए २’ आकारातील भित्तीपत्रके