भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ११७ वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करूनही दंड न भरणार्या धर्मांधाला पोलिसांनी आता नोटीस पाठवली !
झोपलेले पोलीस !
‘भाग्यनगर (तेलंगाणा) येथील वाहतूक पोलिसांनी फरीद खान नावाच्या व्यक्तीला शिरस्त्राण न घालता दुचाकी चालवल्यावरून पकडले होते. यापूर्वी ११७ वेळा त्याने नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला होता; मात्र यांपैकी एकही दंड त्याने भरलेला नसल्याचे उघड झाले. असा अनुमाने ३० सहस्र रुपयांचा दंड त्याच्याकडून वसूल करणे शेष आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला आता नोटीस पाठवली आहे.’