सौंदाणे (जिल्हा नाशिक) येथील ज्योतिषी पंडित वसंत शास्त्री शेवाळे यांनी युद्धाच्या संदर्भातील वर्तवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षातही खरी ठरणे !
‘वर्ष २०१९ मध्ये सौंदाणे (जिल्हा नाशिक) येथील ज्योतिषी पंडित वसंतशास्त्री शेवाळे यांची सनातन संस्थेच्या वतीने भेट घेण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. त्या वेळी मी पंडितजींना एक प्रश्न विचारला, ‘‘तिसरे महायुद्ध कधी चालू होणार आहे ?’’ त्या वेळी पंडितजी म्हणाले, ‘‘तिसरे महायुद्ध चालू होण्यास अजून बराच काळ आहे; परंतु फेब्रुवारी २०२२ मध्ये दोन देशांमध्ये एक युद्ध होईल. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. या युद्धात एखादे शहर नष्ट होण्याची शक्यता आहे.’’
प्रत्यक्षातही फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेन देशावर आक्रमण केले. या युद्धाचा परिणाम जगावर होत असून रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्याच्या सिद्धतेत आहे. यावरून ‘पंडितजी यांनी वर्तवलेली भविष्यवाणी किती अचूक होती ?’ हे आता लक्षात येत आहे.’ – श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२२)
ज्योतिषी पंडित वसंत शास्त्री यांनी तिसरे महायुद्ध आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी वर्तवलेली भविष्यवाणी !‘२.३.२०२२ या दिवशी सौंदाणे येथील ज्योतिषी पंडित वसंतशास्त्री शेवाळे यांनी वर्तवलेली भविष्यवाणी पुढे दिली आहे. १. वर्ष २०२५ ते वर्ष २०२७ या कालावधीत जगात तिसरे महायुद्ध घडणार आहे. त्यात भारताचाही समावेश असणार आहे. २. भारतात वर्ष २०२९ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.’ – श्री. राम होनप (२.३.२०२२) |