रशियाकडून युक्रेनमधील २ शहरांत युद्धविरामाची घोषणा !

नागरिकांना सुखरूप स्थलांतर करण्याची अनुमती

प्रातिनिधिक छायाचित्र

मॉस्को (रशिया) – रशियाने युद्धाच्या १०व्या दिवशी युक्रेनमधील मारियुपोल आणि वोलनोवाखा या २ शहरांमध्ये युद्धविराम करण्याची घोषणा केली आहे. रशियाने नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडता यावे, यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून ५ मार्च या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून युद्धविराम घोषित केला आहे. रशियन सैन्याने वेढा घातलेल्या मारियुपोल शहरांतील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

रशियाने संयुक्त राष्ट्रांत म्हटले की, युक्रेन-रशिया सीमेवर रशियाने बस उपलब्ध करून दिल्या आहेत. याद्वारे युक्रेनमधील खारकीव आणि सुमी या शहरांमध्ये अडकून पडलेल्या परदेशी व्यक्तींना (यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे) युक्रेनमधून बाहेर काढण्यात येणार आहे.