शारीरिक संबंधांसाठी लहान मुलांची खरेदी-विक्री करणार्‍या व्यक्तीला बिल गेट्स भेटत होते ! – गेट्स यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांचा दावा

(डावीकडून) ‘मायक्रोसॉफ्ट’ या आस्थापनाने सहसंस्थापक बिल गेट्स, जेफरी एपस्टिन, गेट्स यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स

नवी देहली – ‘मायक्रोसॉफ्ट’ या आस्थापनाने सहसंस्थापक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असणारे बिल गेट्स यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांची माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी प्रथमच काही गोष्टी उघड केल्या आहेत. त्यांनी ‘बिल गेट्स यांनी गेल्या काही वर्षांत अनेकदा जेफरी एपस्टिन यांची भेट घेतली आहे’, असा दावा केला आहे. एपस्टिन याला अमेरिकेच्या पोलिसांनी शारीरिक संबंधांसाठी लहान मुलांची खरेदी-विक्रीच्या प्रकरणात अटक केली होती. अटकेत असतांनाच ऑगस्ट २०१९ मध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.

१. मेलिंडा यांनी एका मुलाखतीमध्ये हा दावा केला. ‘बिल गेट्स यांनी एपस्टिन यांना भेटू नये, यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले कि नाही ?’, या प्रश्‍नवर मेलिंडा यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्या म्हणाल्या की, याविषयी बिल गेट्स यांनीच स्पष्टीकरण दिले पाहिजे. तेच अशा प्रश्‍नांची उत्तर देऊ शकतात. घटस्फोटासाठीच्या अनेक कारणांपैकी ही भेट हेही एक कारण होते, असेही त्यांनी सांगितले.

२. मेलिंडा पुढे म्हणाल्या की, मला एपस्टिन यांना भेटून ‘ही व्यक्ती कशी आहे ?’, हे पहायचे होते. मी जेव्हा त्याला भेटले, तेव्हा ती एक दुष्ट व्यक्ती असल्याचे माझ्या लक्षात आले. मला या भेटीचा अनुभव भीतीदायक स्वप्नासारखा होता. मला त्या घटनेची आठवण झाली, तरी भीती वाटते. मी त्या व्यक्तीला भेटलेच कशाला ?, असा प्रश्‍न मला पडत रहतो.