कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा
७१ टिन कॅन ‘कॅटल फॅट’, हाडे, शिंगे आणि हत्यारे कह्यात घेतली !
म्हापसा, ४ मार्च (वार्ता.) – कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट (गुरांची चरबी), हाडे, हुक, गॅस बर्नर, शिंगे आणि हत्यारे कह्यात घेतली आहेत.
कह्यात घेण्यात आलेल्या साहित्यावरून या ठिकाणी पूर्ण क्षमतेने अनधिकृत पशूवधगृह चालू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तक्रारीवरून उत्तर गोवा प्रशासनाने कळंगुट पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई केली.
कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर यापूर्वी जुलै २०१३ मध्येही छापा टाकला होता आणि संबंधितांच्या विरोधात गुन्हाही प्रविष्ट झाला होता. (त्या वेळी कठोर शिक्षा न झाल्यामुळे फर्नांडिस पुन्हा असे अनधिकृत पशूवधगृह चालू करण्यास धजावले असावेत ! – संपादक)