मागील चुकांतून आपण काहीच धडा घेतलेला नाही ! – सरन्यायाधिशांनी केंद्र सरकारला फटकारले

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतियांना आणण्याविषयीच्या याचिकांवरील सुनावणी

नवी देहली – आपण मागील चुकांमधून काहीच धडा घेतलेला नाही आणि वाट पहात बसलो, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याविषयीच्या याचिकेवर सुनावणी करतांना केंद्र सरकारला फटकारले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांविषयी चिंताही व्यक्त केली. या वेळी केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले, ‘आतापर्यंत युद्धग्रस्त भागांतून १७ सहस्र भारतियांना बाहेर काढण्यात आले आहे.’ यावर न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रयत्नाचे कौतुक केले. न्यायालयाने म्हटले की, याविषयी आम्हाला काही सांगायचे नाही; मात्र आहाला भारतियांची चिंता आहे.