राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !
‘आपण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांना वाचवण्यासाठी दगडफेक करणार्यांना अन् भारताविषयी प्रेम नसणार्यांना लक्ष्य बनवून राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना पुनःपुन्हा न्यायालयाच्या पिंजर्यात अडकवणार्या षड्यंत्रावर मौन बाळगण्याला का विवश होतो ? कोणता सभ्य देश हे स्वीकारील का ? देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्यूहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का आणि अशा स्थितीत अन्य सामान्य नागरिकांची मनोदशा कशी बरे स्वस्थ राहू शकेल ? सत्तापिपासू असलेल्यांची राष्ट्रीयता जर संशयास्पद असेल, तर ते योग्य ठरील का ?’
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)