आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन !

कोल्हापूर, ४ मार्च (वार्ता.) – जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने स्पर्श कलेक्शन, प्रेरणा बहुउद्देशीय संस्था, चारचौघी मंच, आत्मसाहाय्य संस्था, स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ६ मार्च या दिवशी आरोग्य, नेत्र पडताळणी आणि रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कोंडाआळ येथील ‘ई-बाईक शोरूम’जवळ, लक्ष्मीपुरी येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. तरी याचा अधिकाधिक भगिनींना लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. सीमा राजेंद्र मकोटे यांनी केले आहे.