पेशावरमधील मशिदीत झालेल्या बाँबस्फोटात ३६ जणांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जण घायाळ

मशिदीमध्ये शुक्रवारचे नमाजपठण चालू असतांना आत्मघातकी स्फोट !

  • धर्मांध जेथे अल्पसंख्यांक असतात तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देऊन ते स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते अल्पसंख्यांकांचा वंशसंहार करतात अन् जेथे सगळेच धर्मांध असतात तेथे ते एकमेकांनाच ठार करतात ! – संपादक
  • पाकमध्ये कथित ‘भगवा आतंकवाद’ नसतांनाही मशिदींमध्ये बाँबस्फोट का होतात ?, हे भारतातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि नेते सांगतील का ? – संपादक
घटनास्थळ

पेशावर (पाकिस्तान) – येथील एका मशिदीत शुक्रवारचे नमाजपठण चालू असतांना झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटामध्ये ३६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण घायाळ झाले. नमाजाच्या वेळी एका आत्मघातकी आतंकवाद्याने स्वतःला स्फोटकांद्वारे उडवून दिले. घायाळांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.