भारतियांना बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध थांबवल्याच्या वृत्ताचे परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची

नवी देहली – भारतियांना खारकीव सोडण्यासाठी रशियाने युद्ध ६ घंट्यांसाठी थांबवल्याच्या वृत्ताचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केले. ‘आमच्या विनंतीवरून रशियाने युद्ध थांबवलेले नाही. ‘युद्ध थांबवले’ असे सांगणे म्हणजे ‘आमच्या सांगण्यावरून पुन्हा बाँबफेक चालू होईल कि काय ?’, असे सांगण्यासारखे आहे. मी या वृत्तावर भाष्य करू शकत नाही’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

बागची पुढे म्हणाले की, आतापर्यंत १८ सहस्र भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आतापर्यंत ३० विमानांतून ६ सहस्र ४०० भारतियांना युक्रेनमधून परत आणले आहे. पुढील २४ घंट्यांत १८ उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत.