(म्हणे) ‘एका मृतदेहाऐवजी १० जणांना युक्रेनमधून आणता येईल !
मृत नवीन शेखरप्पा याचा मृतदेह भारतात आणण्याविषयी कर्नाटकमधील भाजपचे आमदार अरविंद बेलाड यांचे असंवेदनशील विधान
बेंगळुरू (कर्नाटक) – युक्रेनमध्ये युद्धात ठार झालेला कर्नाटक येथील नवीन शेखरप्पा याचा मृतदेह युक्रेनमधून परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र त्या देशात युद्ध चालू आहे, अशा परिस्थितीत त्या लोकांना जिवंत आणणे आणि मृतदेह परत आणणे आणखी कठीण झाले आहे. विमानात मृतदेह आणण्यासाठी अधिक जागा लागते. मृतदेहासाठी लागणार्या जागेत १० लोक बसू शकतात, असे विधान कर्नाटकमधील भाजपचे आमदार अरविंद बेलाड यांनी नवीन याचा मृतदेह आणण्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केले.
‘Instead of one body… ’: BJP MLA’s shocker on bringing Naveen’s remains from Ukraine https://t.co/o7R3PZMWnV
— Hindustan Times (@HindustanTimes) March 3, 2022