सहारसा (बिहार) येथे दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून चौघा धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

  • पंचायतीकडून ६३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावून आरोपींची सुटका !

  • धर्मांध पोलीस अधिकार्‍याकडून पीडितांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार

  • बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे युती सरकार असतांना अशा घटना घडणे जनतेला अपेक्षित नाही ! – संपादक
  • धर्मांध वासनांध आणि त्यांना पाठीशी घालणारे धर्मांध पोलीस अधिकारी, पंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांच्यावर बिहार सरकार कठोर कारवाई करणार का ? – संपादक

सहारसा (बिहार) – येथे चौघा धर्मांधांनी दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महुआ उत्तरबाडी पंचायतीमध्ये आरोपींना केवळ ६३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस अधिकारी रहमान अंसारी याने या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यासही नकार दिला होता. या घटनेची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संघटना यांनी समोर आणली आहे. महंमद सरफराज, महंमद सिराज, महंमद शमशाद आणि राजा अशी आरोपींची नावे आहेत.