पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शैलजा फडके यांचे निधन !

पुणे – येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शैलजा भालचंद्र फडके (वय ८७ वर्षे) यांचे त्यांच्या निवासस्थानी ३ मार्च २०२२ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीमती फडके या रामनाथी (गोवा) येथील सनातनचे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. माधव गाडगीळ यांच्या थोरल्या बहीण होत्या. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या त्या आत्या, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या त्या आतेसासू होत्या.

श्रीमती शैलजा फडके या गेली ५० वर्षे पुट्टपर्थीचे (आंध्रप्रदेश) सत्यसाई बाबा यांच्या निस्सिम भक्त होत्या आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होत्या. इंदूर (मध्यप्रदेश) येथे वस्तव्यास असतांना त्या साईबाबांच्या आज्ञेने बालसंस्कारवर्ग घ्यायच्या.