विधान परिषदेत सभापतींसह काही सदस्य मास्कविना उपस्थित !
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – ३ मार्च या दिवशी झालेल्या विधान परिषदेच्या कामकाजाच्या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांसह काही सदस्य मास्क न घालताच सभागृहात उपस्थित होते. विधीमंडळाच्या प्रांगणात आणि प्रत्यक्ष विधानभवनामध्येही अनेकांनी मास्क घातला नव्हता. अधिवेशनाच्या प्रारंभी कोरोनाची चाचणी करून ‘निगेटिव्ह’ अहवाल असलेल्यांनाच विधानभवनात प्रवेश देण्यात आला आहे. चाचणीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यल्प असल्यास पुढच्या आठवड्यात पुन्हा चाचणी न घेण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.