युक्रेनमधून १७ सहस्र भारतीय बाहेर पडले !
कीव (युक्रेन) – युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण भारतियांपैकी आतापर्यंत १७ सहस्र भारतीय युक्रेनमधून बाहेर पडल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. भारतीय वायुसेनेच्या ४ विमानांनी अनुमाने ४०० भारतीय नागरिकांना घेऊन युक्रेनमधून उड्डाण केले आहे. ही विमाने ३ मार्चला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावर पोचतील.
Ministry of external affairs spokesperson #ArindamBagchi on Wednesday said that there had been a sharp increase in the number of Indians who have left #Ukrainehttps://t.co/6S2qSg58vI
— Firstpost (@firstpost) March 2, 2022
खारकीव सोडा, वाहन मिळाले नाही, तर पायी निघा ! – युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतियांना आदेश
युक्रेनमधील भारतीय दूतावासाठी तेथील भारतियांना ‘खारकीव सोडा. वाहन मिळाले नाही, तर पायी निघा’, असा आदेश दिला आहे. दूतावासाकडून एका घंट्यांत २ वेळा हा आदेश देण्यात आला.
URGENT ADVISORY TO ALL INDIAN NATIONALS IN KHARKIV.
FOR THEIR SAFETY AND SECURITY THEY MUST LEAVE KHARKIV IMMEDIATELY.
PROCEED TO PESOCHIN, BABAYE AND BEZLYUDOVKA AS SOON AS POSSIBLE.
UNDER ALL CIRCUMSTANCES THEY MUST REACH THESE SETTLEMENTS *BY 1800 HRS (UKRAINIAN TIME) TODAY*.— India in Ukraine (@IndiainUkraine) March 2, 2022
2nd Advisory to Indian Students in Kharkiv
2 March 2022.@MEAIndia @PIB_India @DDNewslive @DDNational pic.twitter.com/yOgQ8m25xh— India in Ukraine (@IndiainUkraine) March 2, 2022