अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची सुटका नाहीच !

नवाब मलिक

मुंबई – आर्थिक अपव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली नाही.

अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम याच्या आर्थिक गैरव्यवहाराची पडताळणी चालू केली आहे. या प्रकरणी  पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) कायद्याच्या अंतर्गत मलिक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रहित करावा आणि विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने सुनावलेली कोठडी रहित करून सुटका करावी, यांसाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर २ मार्च या दिवशी सुनावणी पार पडली. या वेळी संचालनालयाने याविषयी उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत संचालनालयाला उत्तर प्रविष्ट करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.