साधकांप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या आणि इतरांचा विचार करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) !

१. उत्तम स्मरणशक्ती

‘एकदा सुश्री (कु.) कला खेडेकर आमच्या घरी काही दिवसांसाठी रहायला आल्या होत्या. त्या वेळी मी त्यांना पूर्ण घर आणि घरातील सर्व साहित्याची जागा एकदाच दाखवली. त्यांनी पहिल्याच वेळी सगळे एवढे व्यवस्थित समजून घेतले की, त्यानंतर त्यांना पुन्हा मला काही विचारावे लागले नाही. खरेतर आमच्याकडे असलेला गिझर (पाणी तापवण्याचे यंत्र) वापरण्यास पुष्कळ क्लिष्ट आहे; पण ‘त्याविषयीही एकदाच सांगितल्यावर त्यांच्या ते लक्षात आले’, याचे मला विशेष कौतुक वाटले.

सुश्री (कु.) कला खेडेकर

२. अखंड सेवारत असणे

एकदा पू. सिंगबाळआजींना (हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री) बरे नव्हते. त्यामुळे कलाताईंची रात्री झोप पूर्ण झाली नव्हती. दुसर्‍या दिवशीही पू. आजींना त्रास होतच होता. त्याही स्थितीत त्या पू. आजींची व्यवस्थित काळजी घेत होत्या. त्यांना मी कधीही थकलेले पाहिले नाही. त्या अखंड कार्यरत असतात.

३. इतरांचा विचार करणे

एकदा मी त्यांच्याकडे गेले होते. तेव्हा रात्री मला डास चावले. दुसर्‍या दिवशी त्या मला म्हणाल्या, ‘‘ताई, तिकडे झोपू नका. तिथे पुष्कळ डास आहेत.’’ प्रत्यक्षात मी याविषयी त्यांना काहीही सांगितले नव्हते. रात्री त्यांनी मला झोपण्यासाठी दुसरी जागा दाखवली. त्या ठिकाणी झोपल्यावर मला डास चावले नाहीत.

कु. मैथिली जोशी

४. कृतज्ञताभावात रहाणे

आम्ही काही साधिका पू. सिंगबाळआजींच्या आणि त्यांच्या साहाय्याकरता जातो. त्याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि त्या अतिशय प्रेमाने ते व्यक्तही करतात.’

– कु. मैथिली जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(८.२.२०२२)