मोगलांनी राजपूतांचा नरसंहार केला, तसा रशिया आमचा करत आहे ! – युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा  

उजवीकडे युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा

नवी देहली – रशियाने युक्रेनच्या विरोधात छेडलेले युद्ध हे भारतात मोगलांनी राजपूतांच्या विरोधात घडवलेल्या नरसंहारासारखे आहे, असे विधान युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी केले. युक्रेनमधील खारकीव येथे रशियाने केलेल्या आक्रमणात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. पोलिखा यांनी नवी देहलीतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला. त्या वेळी ते बोलत होते. ‘भारताकडून युक्रेनला मानवतावादी साहाय्य देण्याविषयी चर्चा झाली. हे साहाय्य देण्यासाठी आम्ही भारताचे आभारी आहोत’, असेही ते या वेळी म्हणाले.

डॉ. पोलिखा पुढे म्हणाले की, आम्ही मोदी यांच्यासह सर्व प्रभावशाली जागतिक नेत्यांना पुतिन यांना  रोखण्यासाठी सर्व साधनांचा वापर करण्यास सांगत आहोत. रशियाने आता नागरी भागातही गोळीबार चालू केला आहे.