शिवसेनेचे कार्य घराघरात पोचवा ! – राजू यादव, शिवसेना
कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य घराघरात पोचवावे, असे आवाहन करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले.
उंचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन आणि मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण होते. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, पोपट दांगट, दीपक रेडेकर यांसह अन्य उपस्थित होते.