शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या १२ हून अधिक शेल आस्थापना असल्याचे उघडकीस !
मुंबई – मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्या १२ हून अधिक शेल (कागदोपत्री) आस्थापना असल्याचे उघडकीस आले आहे. या आस्थापनांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचेही चौकशीत समोर आले आहे. आस्थापना कायद्यानुसार या आस्थापनांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर धाड मारली होती.
महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या बड्या नेत्यांवर येत्या काही दिवसांत कारवाया केल्या जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिली.