युक्रेनमधील रुग्णालयांत प्राणवायुचा (ऑक्सीजनचा) मोठा तुटवडा
जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त
कीव (युक्रेन) – युक्रेनमध्ये प्राणवायुचा (ऑक्सीजनचा) मोठे तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या युक्रेन आणखीनच संकटात सापडला आहे. या तुटवड्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून ‘जर युक्रेनमधील रुग्णालयांत त्वरित प्राणवायु उपलब्ध करून दिला नाही, तर मोठा अनर्थ घडू शकतो’, अशी भीती व्यक्त केली आहे. युक्रेनमध्ये ६०० रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमधील प्राणवायु संपल्यामुळे, तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे प्राणवायुची निर्मिती करणार्या कारखान्यांपर्यंत ट्रक पोचणे शक्य नसल्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. युक्रेनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या १ सहस्र ७०० इतकी आहे. येथे कोरोनाच्या रुग्णांसह नवजात बालके, गर्भवती महिला आणि वयस्कर व्यक्ती यांनाही वेळोवेळी प्राणवायुची आवश्यकता लागू शकते, असे सांगण्यात आले आहे.
वीजटंचाईचे संकटही गडद !
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे संपूर्ण युक्रेनमध्ये वीजटंचाईचेही संकट गडद झाले आहे.